आपल्या भारतीय संस्कृतीने ” वसुधैव कुटुंबकं ” हा विचार दिला.आपले संत ज्ञानेश्वर म्हणतात कि ” हे विश्वची माझे घर. तुकाराम महाराज ” वृक्षवल्ली आम्हा सोयरे , वनचरे ” हा विचार देतात. सृष्टीच्या कणा कणात देव आहे. पण आज आपल्या पृथ्वीला ” हवामान बदल ” ह्या शत्रूने वेढा दिला आहे.तो वेढा इतका गंभीर आहे कि आपण जर त्यावर वेळीच उपाय-योजना केल्या नाहीत तर २०७० साली मुंबईच काय पण समुद्रालगतचे २० देश बुडतील.अनेक देशांमध्ये दुष्काळ पडतील,वारंवार वादळे येतील.माणसांना एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतर करावे लागेल आणि मग त्यातून भांडणे होतील,लुटालूट-खून,उपासमार होईल.आज रोजी हवामान बदलामुळे १ कोटी माणसे निर्वासित कॅम्पमध्ये राहत आहेत.२०७० रोजी हा आकडा १०० कोटी असेल.शेतीतून येणारे उत्पन्न ५० टक्क्यांनी कमी होईल आणि साहजिकच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील.गेल्या १० वर्षात १० लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.काल परवा ऑस्ट्रेलियामध्ये लागलेली आग हि हवामान बदलामुळेच लागलेली होती.त्यात १०० कोटी जनावरे जनावरे मारली गेली.
२०० देशांची सरकारे आपआपल्या परीने ‘हवामान बदलावर’ ऍक्शन घेत आहेत.पण ह्या पृथ्वीचा एक घटक म्हणून आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो ?
आपण नक्कीच ह्यात खरीच वाटा उचलू शकतो.
” एक कण ” या अभियानामार्फत विध्यार्थी रोज रात्री १० वाजता आमच्या आई-वडिलांचा मोबाईल मागणार आहोत. त्यावर एक मिनिटासाठी हक्क गाजवणार आहोत.मोबाईलमधील वाय-फाय , ब्लु-टूथ,मोबाइल-डेटा असे नको फंक्शन बंद करणार आहोत. असे केल्याने मोबाईलची बॅटरी वाचेल , वीज वाचेल. ती वीज तयार करायला लागणारे लागणारे एक कण पाणी आणि एक कण कोळसा वाचवू शकतो. हीच आमची क्लायमेट अक्शन असेल. थोडक्यात काय तर नैसर्गिक साधन -संपत्तीचा काटकसरीने उपयोग करून आपण हवामान बदलाचा परिणाम एक कण का होईना पण कमी करू शकतो.ह्या आभाळभर पसरलेल्या आणि न दिसणाऱ्या दुःखावर एक प्रेमाची फुंकर मारू शकतो आणि खऱ्या अर्थाने हा पृथ्वी म्हणजेच ” वसुधैव कुटुंबकम् ” सुजलाम-सुफलाम होऊ शकते.
असे केले तरच आमच्या शिक्षणाचा उपयोग होईल.
मग तुम्हीसुद्धा रोज रात्री झोपण्यापूर्वी बंद करणार ना,नको असलेले मोबाईलमधील फंक्शन्स ?
आपली अंघोळीची गोळी संस्था