पर्यावरण बचावासाठी आंघोळीची गोळी संस्थेमार्फत चिमुकली आयुता रांगोळे करतेय हवामानठोसा चा प्रचार
आयुता रांगोळे ही छोटी मुलगी हवामानठोसा चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटत आहे ,नुकतीच ती मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांना भेटली ती भेटून याबद्दल माहिती देते आणि विचारते की ….
तुम्ही हवामानठोसा
देणार का?
हवामानठोसा म्हणजे आपली पृथ्वी वाचवण्यासाठी उचललेले छोटे पाऊल. सगळ्यांना माहीत आहे की पृथ्वीला हवामान बदल (Climate Change) हा आजार झालाय. त्यावर उपाय म्हणजे हवामानठोसा.
हवामानठोसा म्हणजेच Climate Action हवामानठोसा म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक स्त्रोत जपून वापरणे. १)नको असलेले दिवे,फॅन बंद करणे. २)पाणी बचत करणे ३)चौकात सिग्नल सुटायला वेळ असेल तर गाडी बंद करणे. ४)प्लास्टिक न वापरणे. ५)झाडे लावणे ती जगवणे,झाडांना सन्मान देणे.
अश्या रितीने आपली पृथ्वी वाचवण्यासाठी हवामानठोसा देण्यासाठी ती सर्वांना आवाहन करताना दिसत आहे.