क्या बात ! खिळे मुक्त झाडं या उपक्रमासाठी आयुक्त थेट रस्त्यावर…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकने स्वच्छागृह हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील कचरा या समस्यावर काम केले जाणार आहे. अंघोळीची गोळी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते गेली ४ वर्षे झाडांवर लावलेले अनधिकृत बोर्ड- बॅनर आणि खिळे काढत आहेत.
या संस्थेचे अध्यक्ष माधव धनवे पाटील म्हणतात की अनधिकृत बोर्ड, बॅनर आणि खिळे म्हणजे आमच्यासाठी कचराच आहे. झाडांवरील हा कचरा काढणे म्हणजे झाडांना सन्मान देणे होय.
स्वच्छागृह या उपक्रमाचा एक भाग म्हणून अंघोळीची गोळीचे सूर्यकांत मुथीयान आणि अंजु सोनावणे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना झाडांवरचा कचरा काढण्याची विनंती केली. आयुक्तांनीही मग स्वतः रस्त्यावर उतरून एका झाडावरचा बॅनर काढला.
“आयुक्तांच्या या कृतीने स्वच्छागृह या उपक्रमामध्ये खिळेमुक्तझाडं या उपक्रमाला चालना दिली आहे. लोकही झाडांवरचा कचरा काढण्यासाठी आग्रही राहतील असा विश्वास अंजु सोनावणे यांनी व्यक्त केला.
यावेळी अंघोळीची गोळीचे कार्यकर्ते सुभाष पाटील, गणेश बोरा आणि राहुल धनवे उपस्थित होते.